संस्थेची उद्दिष्टे

महाराष्ट्र राज्यातील सहकारी संस्थांना योग्य भावात, योग्य मापात चांगल्या जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणे हा महासंघाचा मुख्य उद्देश आहे. तसेच ज्या ज्या वेळेला राज्यात जीवनावश्यक वस्तूंची टंचाई निर्माण होते किंवा कृत्रिमरित्या टंचाई निर्माण केली जाते अशावेळी राज्यातील ग्राहकांना जीवनावश्यक वस्तूंचे वितरणाचे काम महासंघामार्फत पुढाकाराने घेतले जाते.

१.       या व्यतिरिक्त सभासद सहकारी ग्राहक संस्थांच्या वतीने व माध्यमांतून राज्यात ग्राहकोपयोगी जीवनावश्यक वस्तूंचे वितरण करणे.

२.      सहकारी  ग्राहक संस्थांना मदत करणे.

३.      थेट उत्पादकांकडून माल खरेदी करण्यासाठी मुख्य खरेदी विक्री एजंट म्हणून काम करणे.

४.     राज्य शासनास घाऊक खरेदी करण्यासाठी मदत करणे.

५.     सहकारी ग्राहक संस्थांच्या अडचणीच्या काळात व्यवस्थापन सांभाळणे व ग्राहकांना थेट सेवा देणे.

६.      जेथे सहकारी ग्राहक भांडारे उपलब्ध नसतील व आर्थिक अडचणीत असतील अशा ठिकाणी ग्राहक भांडारे सुरु करून ग्राहकांना थेट सेवा देणे.

७.     जीवनावश्यक वस्तूंच्या टंचाईच्या काळात थेट खरेदी करून ग्राहकांना थेट वितरण करणे व बाजारपेठेतील किंमती वाढू न देण्याबाबत प्रयत्न करणे.

सन १९६४ ते सन २०१०-२०११ – महासंघाने खालील योजना यशस्वीरित्या राबविल्या आहेत

१.       केंद्र सरकारची योजना एन.सी.सी.एफ. चे माध्यमातून महासंघाने नियंत्रित कापडाचा व्यवहार व्यवहार सहकारी ग्राहक संस्थेचे माध्यमांतून चांगल्या प्रतीचा माल योग्य दरात ग्राहकांपर्यंत पोहचविण्याचे काम करण्यात आले. (सन १९७५-१९८५)

२.      महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक मंडळ पुणे यांचे मार्फत उत्पादन होणाऱ्या रास्त दरांच्या वह्यांचे राज्यातील प्राथमिक शाळापर्यंत पोहचविण्याचे काम करण्यात आले. (१९८०-१९८४)

३.      राज्यातील गलगंड या रोगावर नियंत्रण ठेवण्यासाठी आयोडीनयुक्त मिठाचे औरंगाबाद, जालना जिल्ह्यातील किरकोळ दुकान विक्रेत्यांपर्यंत वितरण करण्यात आले.

४.     एन.सी.सी.एफ. नवी दिल्ली यांचेकडून जप्तमालाची घाऊक पध्दतीने खरेदी करून सहकारी ग्राहक संस्थांना वितरण करण्यात आले व काही किरकोळ विक्री केंद्रांतून ग्राहकांना चांगल्या प्रतीचा माल योग्य दरात पुरवठा करण्यात आला. (आजमिती पर्यंत)

५.     शासनाच्या एन.सी.डी.सी. योजनेअंतर्गत महासंघाचे वतीने तालुका पातळीवर वितरण केंद्रे काढून ग्रामीण भागातील ग्राहकांना योग्य दरात जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्याचे काम करण्यात आलेले आहे. (१९८३-१९९०)

६.      राज्यातील सहकारी साखर कारखाने, सहकारी पतसंस्था, खाजगी कंपन्या, शासकीय कार्यालयातील कर्मचारी यांना मासिक हफ्ते पध्दतीने वुलन ब्लॅंकेट, शाल इ. वस्तूंचा त्यांचे मागणीप्रमाणे चांगल्या प्रतिचा माल योग्य दरात पुरवठा करण्यात आलेला आहे. (१९८३-२००३-०४)

७.     राज्यातील कारागृहांमधील कैद्यांना लागणाऱ्या दैनंदिन अन्नधान्य, खाद्यवस्तू, भाजीपाला व नित्योपयोगी वस्तुंचा नियमित व वेळेवर योग्य दरात पुरवठा करण्यात आलेला आहे. (१९८९-१९९७)

८.      कापड उत्पादन करणाऱ्या कंपन्यांकडून महासंघामार्फत घाऊक पध्दतीने निरनियंत्रित कापड मालाची खरेदी करून राज्यातील सहकारी संस्थांचे माध्यमातून ग्रामीण भागातील ग्राहकांपर्यंत चांगल्या प्रतिचा माल योग्य दरात पुरवठा करण्याचे काम करण्यात आले. (१९७०-१९८४)

९.      केंद्र शासनाने आयात केलेल्या अमेरिकन मक्याचे नाफेड मार्फत राज्यातील पशुखाद्य व पोल्ट्री फार्मला वितरण केलेले आहे.

१०.    विभागीय कार्यालय, कोल्हापूर येथे ‘मयुर छाप’ अगमार्क मिरची पूड, हळद पावडरचे उत्पादन करुन संपूर्ण राज्यात वितरण.

११.   राज्यात शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत इ. १ली ते ५ वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना ३ किलो तांदूळाचे प्रत्येक शाळेवर तांदूळ वितरणाचे कामकाज करण्यात आले आहे. (२००१-०२ व २००२-०३)

सन 2010 – 2015

१.    महासंघाच्या वतीने राज्यातील एकात्मिक बालविकास सेवा योजना अंतर्गत आदिवासी / ग्रामीण भागातील अंगणवाडी प्रकल्पांना धान्यादी खाद्यवस्तुंचा पुरवठा करणे.

२.    महिला व बालविकास विभागाच्या अधिपत्याखालील महिला राजगृहे, महिला संरक्षण गृहे, शासकिय बालगृहे या संस्थांना अन्नधान्याचे व इतर वस्तुंचा पुरवठा करण्याचे काम करण्यात येणार आहे.

३.    सामाजिक न्याय विभागाअंतर्गत चालविण्यात येणारा मागासवर्गीय मुला-मुलींची शासकिय वसतिगृहे, शासकिय निवासी/अनुसुचित जातीच्या मुलां-मुलींकरीता उच्चतर आय.टी.आय. अपंग, अंध संमित्र केंद्र यासाठी लागणाऱ्या अन्नधान्य, खाद्यवस्तू, भाजीपाला इ. नित्योपयोगी वस्तुंचा पुरवठा करणे.

४.    राज्यातील सर्व शासकिय/निमशासकिय कार्यालये, शासकिय महामंडळ यांना दैनंदिन कामकाजात आवश्यक असणारी कार्यालयीन स्टेशनरी, कापड, अन्नधान्य, किराणा, संगणकीय स्टेशनरी, उपकरणे, शालेय साहित्य तसेच इतर नित्योपयोगी वस्तुंचा पुरवठा करण्याचे काम करणेत येणार आहे.

५.    राज्यातील शासकिय विद्यानिकेतन कार्यालयास लागणाऱ्या अन्नधान्य, खाद्योपयोगी वस्तू व लेखन साहित्य, स्टेशनरी, कपडे व इतर वस्तुंचा पुरवठा करण्यात येणार आहे.

६.    राज्यातील वैद्यकिय शिक्षण व औषधीद्रव्ये विभागाच्या अधिपत्याखालील शासकिय वैद्यकिय/दंत महाविद्यालये व रुग्णालयाअंतर्गत उपलब्ध बांधकामातील योग्य जागेत महासंघाचे वतीने औषधे दुकाने सुरु करुन रुग्णांची सोय व्हावी व चांगल्या प्रतिचे औषध उपलब्ध करुन देण्याची योजना राबविण्यात येत आहे.

७.    मुंबई, बृहन्मुंबई क्षेत्रातील दारिद्र्यरेषेवरील ए.पी.एल. व दारिद्र्यरेषेखालील बी.पी.एल. लाभार्थींना नियंत्रित साखरेचा पुरवठा करणेकरिता थेट कारखान्यामधून साखरेची उचल करुन रास्त भाव दुकानांपर्यंत पोहचविणे.

८.    राज्यातील वैद्यकिय शिक्षण व औषधीद्रव्ये विभागाच्या अखत्यारितील शासकिय वैद्यकिय/आयुर्वेदिक महाविद्यालयांशी संलग्नीत रुग्णालयांना लागणारे अन्नधान्य, खाद्यवस्तू, भाजीपाला व इतर कार्यालयीन नित्योपयोगी वस्तुंचा पुरवठा करण्याचे काम करण्यात येणार आहे.

९.    शेतकऱ्यांकडून थेट कांदा, भाजीपाला, फळे व फुले यांची खरेदी करून ग्राहकांपर्यंत योग्य दरात पुरवठा करण्याचे काम करण्यात आलेले आहे.

१०.    महासंघाच्या अपना भंडार या किरकोळ विक्री केंद्रातून ग्राहकांना चांगल्या प्रतिचा माल योग्य दरात व योग्य मापात व काही पॅकींग वस्तूंवर सूट देऊन विक्री करण्यात येतो. तसेच या केंद्रातून ग्राहकांचे दूरध्वनीवरून दिलेल्या मागणीप्रमाणे स्वखर्चाने घरपोच माल करण्याची तत्पर सेवा ग्राहकांना देण्यात येत आहे.

११.   आदिवासी विभागातील वसतिगृहांना लागणाऱ्या अन्नधान्य, खाद्यवस्तु व दैनंदिन नित्योपयोगी वस्तूंचा पुरवठा करण्यात येणार आहे.

याशिवाय महाराष्ट्र शासनाचे वेळोवेळी आवश्यकतेनुसार निश्चित केलेल्या योजनेप्रमाणे महासंघाच्या वतीने कामकाज करण्यात येते.

मुख्य कार्यालय

87-ए, राज चेंबर्स,
पाचवा मजला,
देवजी रतनशी मार्ग, दाणाबंदर,मुंबई - 400 009.
दूरध्वनी : 022-23480520
           022-23484967