अध्यक्षांचे मनोगत

श्री सुखदेव चौगुले

आपल्या देशात सहकारी ग्राहक संस्थांची रचना ही चार स्तरावर आहे. हे चार स्तर देश, राज्य, जिल्हा व तालुका असे आहेत. देश स्तरावर नवी दिल्ली येथे नॅशनल को-ऑपरेटिव्ह कन्झ्युमर्स फेडरेशन लि. नवी दिल्ली ही संस्था कार्यरत आहे. आपल्या राज्यात महाराष्ट्र राज्य को-ऑपरेटिव्ह कन्झ्युमर्स फेडरेशन लि., मुंबई ही संस्था सर्व ग्राहक सहकारी संस्थांची शिखर संस्था म्हणून कामकाज पाहात आहे. या ग्राहक सहकारी शिखर संस्थेच्या अधिपत्याखाली प्रत्येक जिल्ह्यांत जिल्हा मध्यवर्ती सहकारी भांडारे आणि तालुक्यात प्राथमिक सहकारी ग्राहक भांडारे आहेत.

देशातील सहकारी ग्राहक संस्थांची रचना खालीलप्रमाणे आहेः

 देशस्तरावर – नॅशनल को-ऑपरेटिव्ह कन्झ्युमर्स फेडरेशन लि. नवी दिल्ली

 राज्यस्तरावर – महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह कन्झ्युमर्स फेडरेशन लि, मुंबई

 जिल्हास्तरावर – जिल्हा मध्यवर्ती सहकारी ग्राहक भांडारे

 तालुका व गावस्तरावर – प्राथमिक सहकारी ग्राहक भांडार

आपल्या राज्यात महाराष्ट्र राज्य को-ऑपरेटिव्ह कन्झ्युमर्स फेडरेशन लि., मुंबई ही सहकारी ग्राहक संस्थांची शिखर संस्था सन १९६४ रोजी स्थापन झालेली आहे. महासंघाची राज्यात जिल्हास्तरावर एकूण ८ विभागीय कार्यालये व अपना भांडार या नावाने बहुउद्देशिय ग्राहत भांडारे चांगल्या प्रकारे काम करीत आहेत. राज्यातील सहकारी ग्राहक संस्थांना योग्य भावात, योग्य मापात चांगल्या जीवनावश्यक वस्तुंचा पुरवठा करणे हा महासंघाचा मुख्य उद्देश आहे.

ग्राहक सहकारी चळवळीमध्ये महासंघाचा व ग्राहक सहकारी संस्थांचा पुढीलप्रमाणे सहभाग आहे.

सर्वसामान्य ग्राहकांची होणारी पिळवणूक थांबविणेसाठी, बाजारपेठेवर सहकारी ग्राहक संस्थेच्या माध्यमांतून नियंत्रण ठेवण्याचे कामकाज केले जाते. जीवनावश्यक वस्तूंचा बाजारात तुटवडा भासल्यास सरकारच्या सहकार्याने ग्राहक संस्थांच्या मार्फत या वस्तू रास्त दराने विक्री करण्याचे काम केले जाते.

महासंघामार्फत सध्या राज्यातील महिला व बालकल्याण विभागाअंतर्गत अंगणवाडी प्रकल्पांना धान्यादि खाद्यवस्तंचा पुरवठा करणे, महिला व बाल विकास विभागाच्या अधिपत्याखालील महिला राजगृहे, महिला संरक्षण गृहे, शासकिय बालगृहे या संस्थांना अन्नधान्याचा व इतर वस्तूंचा पुरवठा करणे, सामाजिक न्याय विभागाअंतर्गत मागासवर्गीय मुलामुलींच्या शासकिय वसतिगृहांना अन्नधान्य, खाद्यवस्तू, भाजीपाला अशा नित्यपयोगी वस्तुंचा पुरवठा करणे अशी कामे केली जातात. तसेच राज्यातील २४ जिल्ह्यांमधील प्राथमिक व माध्यमिक शाळांतील विद्यांर्थ्यांना मध्यान्ह भोजन योजनेअंतर्गत अन्नधान्य पुरविले जाते. राज्यशासनाच्या वैद्यकिय शिक्षण व औषधीद्रव्ये विभागाच्या अधिपत्याखाली असलेल्या शासकिय वैद्यकिय/दंत महाविद्यालये व रुग्णालयांतर्गत रुग्णांची सोय व्हावी व चांगल्या प्रतिची औषधे उपलब्ध करून देणे तसेच अन्नधान्य व इतर कार्यालयीन नित्योपयोगी वस्तूंचा पुरवठा करण्याचीही जबाबदारी महासंघावर सोपविलेली आहे. याशिवाय आदिवासी विभागातील वसतिगृहांना लागणारे अन्नधान्य, खाद्यवस्तू व दैनंदिन नित्योपयोगी वस्तूंचा पुरवठा करण्याचे कामही महासंघाचे आहे. या राज्य सहकारी ग्राहक संघाचा हा व्याप डोळ्याखालून घातला तरी आमच्या कार्याची व्याप्ती सहजपणे लक्षात येईल.

थोडक्यात, ज्या ज्या ठिकाणी सरकारची खात्रीशिर आणि किफायतशिर मदत आणि सेवा पुरवली गेली पाहिजे तेथे आम्ही समर्पित भावनेने काम करीत असतो. आमच्या या  कार्याचा कधीही गवगवा होत नाही परंतु राज्य सरकारच्या जनतोपयोगी योजना राबविणेसाठी आमचा खारीचा वाटा आहे. एकूण सहकारी चळवळीत आमचा सहभाग आहे याचेच आम्हाला समाधान वाटते.

महाराष्ट्रात ‘महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह कन्झ्युमर्स फेडरेशन लि. मुंबई’ ही राज्यातील सहकारी संस्थांची शिखर संस्था सन १९६४ रोजी स्थापन झालेली आहे. महासंघाची राज्यात जिल्हास्तरावर एकूण ८ विभागीय कार्यालये व अपना भंडार या नावाने बहुउद्देशिय ग्राहक भंडारे कार्यरत आहेत. महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह कन्झ्युमर्स फेडरेशन लि. मुंबई या आमच्या संस्थेचा राज्यातील ग्राहक सहकारी चळवळीमध्ये प्रामुख्याने सहभाग आहे. महाराष्ट्र राज्यातील सहकारी ग्राहक संस्थांना योग्य भावात, योग्य मापात चांगल्या जीवनाश्यक वस्तुंचा पुरवठा करणे हा महासंघाचा मुख्य उद्देश आहे.

ग्राहक सहकारी चळवळीमध्ये महासंघाचा व ग्राहक सहकारी संस्थांचा खालीलप्रमाणे सहभाग आहे. सर्वसामान्य ग्राहकांची होणारी पिळवणूक थांबविणेसाठी, बाजारपेठेवर सहकारी ग्राहक संस्थेच्या माध्यमातून नियंत्रण ठेवण्याचे कामकाज केले जाते. तसेच जिवनावश्यक वस्तुंचा बाजारात तुटवडा झाल्यास, शासनाचे सहकार्याने ग्राहक संस्थांचे मार्फत या वस्तू रास्त दरांने विक्री करण्याचे काम केले जाते.

मुख्य कार्यालय

87-ए, राज चेंबर्स,
पाचवा मजला,
देवजी रतनशी मार्ग, दाणाबंदर,मुंबई - 400 009.
दूरध्वनी : 022-23480520
           022-23484967