महासंघाचे उपक्रम

महाराष्ट्र स्टेट को-ऑप कन्झ्युमर्स फेडरेशन लि., मुंबई या संस्थेमार्फत सध्या प्रामुख्याने खालीलप्रमाणे व्यवसाय केले जात आहेत व योजना राबविल्या जातात.

नियंत्रित साखर पुरवठा – मुंबई येथील बी.पी.एल. ग्राहकांना आवश्यक असणारी नियंत्रित साखर, नियंत्रक शिधावाटप मुंबई यांचे आदेशानुसार संबंधीत साखर कारखान्यांकडून उचल करून शहरातील रेशन धान्य दुकानांना सदर साखरेचे वाटप केले जाते.

ए.पी.एल. साखर पुरवठा – महाराष्ट्र शासनाच्या अन्न व नागरी पुरवठा विभाग यांचे आदेशानुसार मुंबई व ठाणे शहरातील रेशन कार्डधारकांना प्रती कार्ड 1 किलो साखर रु. 20 या दराप्रमाणे विक्री करणेसाठी संबंधीत साखरकारखान्याकडून साखर उचल करून ती शासनाच्या ताब्यात देण्याचे कामकाज महासंघामार्फत करण्यात आलेले आहे.

शासकिय रुग्णालयांना अन्नधान्य पुरवठा – राज्यातील वैद्यकिय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाच्या अंतर्गत असणाऱ्या शासकिय रुग्णालयांमधील रुग्णांकरिता आवश्यक असणारे अन्नधान्य व इतर साहित्याचा पुरवठा, शासनाने सन 2008-09 मध्ये प्रसिध्द केलेल्या निवेदनाप्रमाणे महासंघासाठी मंजूर केलेल्या दराप्रमाणे केल जातो. मुंबईतील रुग्णालयांना मुख्य कार्यालयांमार्फत सदर पुरवठा केला जातो व अन्य रुग्णालयांना पुरवठा हा त्या त्या कार्यक्षेत्रातील विभागीय कार्यालयांमार्फत केला जातो.

महिला बाल कल्याण अन्नधान्य पुरवठा – राज्यातील महिला बाल कल्याण विभागाच्या अंतर्गत असणाऱ्या शासकीय वसतिगृहांमधील लाभार्थ्यांकरिता  आवश्यक असणारे अन्नधान्य व इतर साहित्याचा पुरवठा, शासन निर्णय सन 2005 प्रमाणे महासंघामार्फत जिल्हास्तरावर मंजूर केलेल्या दरापमाणे केला जातो, मुंबईमधील वसतीगृहांना मुख्य कार्यालयामार्फत सदर पुरवठा केला जातो व अन्य वसतीगृहांना पुरवठा हा त्या त्या कार्यक्षेत्रातील विभागिय कार्यालयामार्फत केला जातो.

अंगणवाडी पुरवठा - महाराष्ट्र शासनाच्या महिला व बाल कल्याण विभागाचे शासन निर्णयापमाणे राज्यातील जिल्हा परिषदांअंतर्गत अंगणवाड्यांना आवश्यक असणाऱ्या   पुरक पोषण आहाराचा पुरवठा राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये महासंघामार्फत केला जातो. ज्या जिल्हयामधील बचत गट सक्षमपणे पूरक पोषण आहाराचा पुरवठा करीत नाहीत अश्या जिल्ह्यांमध्ये महासंघामार्फत अंगणवाड्यांसाठी पुरक आहाराचा पुरवठा केला जातो. सदरचा पुरवठा हा त्या विभागीय कार्यालयांमार्फत केला जातो. 

रुग्णालय परिसरांमध्ये औषधी दुकान – महाराष्ट्र शासनाच्या वैद्यकिय शिक्षण विभागामार्फत दिनांक 2 मार्च 2009 च्या शासन निर्णयाप्रमाणे शासकिय वैद्यकिय महाविद्यालय व रुग्णालय परिसरातील जागेत औषधी दुकान सुरु करण्याकरिता महासंघासाठी 200 ते 250 चौ. फुट जागा शासनाने उपलब्ध करून दिलेली आहे. या जागेमध्ये महासंघामार्फत औषधी दुकान चालविले जाते. राज्यातील सुमारे 12 रुग्णालयांमध्ये अशा प्रकारची औषधी दुकाने महासंघामार्फत सुरु आहेत.

जनरल पुरवठा – महाराष्ट्र शासनाच्या सहकार व पणन विभागाचा शासन निर्णय दिनांक 23 मे 2007 च्या आधारे राज्यातील शासकिय तसेच निमशासकिय कार्यालयांना त्यांच्या विविध योजनेअंतर्गत आवश्यक असणाऱ्या साहित्याची मागणी ते महासंघाकडे करतात व त्या मागणीच्या आधारे महासंघामार्फत त्यांना संबंधीत वस्तुंचा पुरवठा केला जातो. सदरहू पुरवठा मुख्यकार्यालयामार्फत तसेच त्या त्या क्षेत्रातील विभागीय कार्यालयांमार्फत केला जातो.

फिरती रेशन दुकाने – महाराष्ट्र शासनाच्या मुख्य व नागरी पुरवठा विभागामार्फत महासंघास 4 वाहने फिरती रेशन दुकान चालविण्याकरिता देण्यात आलेली आहेत. महासंघाने सदरहू चारही वाहने बृहन्मुंबई ग्रेन डिलर्स असो., मुंबई यांच्याकडे शासनाच्या अटीशर्तीनुसार करारनामा करून भाडेतत्वावर चालविणेस दिलेला आहे.

अपना भांडारे – महासंघामार्फत मुंबई येथे २, रायगड येथे १, नागपूर येथे १, सांगली येथे १ व नाशिक येथे १ अशी ६ अपना भांडारे कार्यरत असून या अपना भांडारांमार्फत ग्राहकांना अन्नधान्य व इतर दैनंदिन जीवनावश्यक वस्तुंचा योग्य दरात पुरवठा केला जातो. संबंधीत भांडारांसाठी आवश्यक असणारी मालाची खरेदी ही संबंधीत शाखाप्रमुख त्यांचे आवश्यकतेनुसार स्थानिक व घाऊक बाजारातून खरेदी करतात व निश्चित नफा घेऊन मालाची विक्री करतात.

कोळसा व्यवसाय – महाराष्ट्र शासनाच्या उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाने राज्यातील लघु व मध्यम उद्योजकांना आवश्यक असणाऱ्या कोळशाचा पुरवठा करणेकरिता ‘महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह कन्झ्युमर्स फेडरेशन लि., मुंबई’ या संस्थेची नॉमिनी म्हणून नियुक्ती केलेली आहे. कोल इंडिया प्रा. लि. यांनी त्यांचेशी संलग्न कंपनीकडून प्राप्त होणाऱ्या कोळशाचे वितरण, शासनाच्या नियमानुसार उद्योजकांना करण्याचे कामकाज आहे. सदरचे कामासाठी सन 2011-12 करिता शासनाने नॉमिनी म्हणून नियुक्ती केली होती. परंतु अहवाल सालात प्रत्यक्षात सदरहू कामकाजास काही कारणास्तव सुरु करण्यात आलेली नाही. सन 2012-13 करिताही शासनाने महासंघाची या कामासाठी पुनर्नियुक्ती केलेली असून माहे मे 2012 पासून लघू व मध्यम उद्योजकांना कोळसा पुरवठा करण्याचे कामाजास प्रत्यक्षात सुरुवात झालेली आहे.

 

मुख्य कार्यालय

87-ए, राज चेंबर्स,
पाचवा मजला,
देवजी रतनशी मार्ग, दाणाबंदर,मुंबई - 400 009.
दूरध्वनी : 022-23480520
           022-23484967